| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरातून मोटारसायकलसह इतर वाहने चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
समीर ज्ञानेश्वर पाटील (26), रा. मु.पो. कोल्ही कोपर, ता. पनवेल यांनी त्यांची 50,000/- रुपये किंमतीची यामाहा कंपनीची मोटार सायकल कमांक एम. एच. /46/ बी.जे./ 9074 हि मु. पो. भंगारपाडा, घर नंबर 134, ता. पनवेल, याठिकाणी पार्क करून ठेवली असत ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक तपासाच्या मदतीने पनवेल शहर पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपी कौशल श्रीरंग पाटील, रा. पाणदिवे, पो. कोपरोली, जि. रायगड यास पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच त्याचे चोरी केलेल्या इतर पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच मोटारसायकल चोरी करण्याकरिता आरोपीने वापरलेला महिंद्रा कंपनीची टेम्पो हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपीकडुन तीन लाख रूपये कि.च्या तीन मोटार सायकल एक लाख रूपये कि.ची बुलेट, एक लाख रूपये कि.च्या दोन मोपेड मोटार सायकल व चार लाख रूपये कि. चा टेम्पो, व असे एकुण नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त बी. के. सिंग, सह. पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-02 पनवेल शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पार पाडली.
सराईत मोटारसायलक चोर जेरबंद
