| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर परिसरात मोटार सायकली चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलीसांनी गजाआड केले असून त्यांच्या कडून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. पोलीस पथकाने पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून पळस्पे दत्त सँक समोर गाडी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी इम्रान शहा ( वय 36 ) रा. पेठ गाव याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन समोर उभी केलेली शशिकांत पाटील यांची मोटारसायकल व बुधाराम चौधरी यांची पी. के वाईन शॉप समोरील मोटारसायकल चोरीस गेल्या होत्या . त्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.