| पनवेल | वार्ताहर |
एक 20 वर्षीय तरुण कोणास काहीएक न सांगता कोठे तरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विजय विष्णू राठोड ( वय 20 ) रा. मु. कोप्रोली , अंगाने सडपातळ , उंची पाच फूट चार इंच , वर्ण सावळा ,चेहरा उभट ,नाक सरळ , केस काळे असून अंगात निळ्या रंगाचे जॅकेट व काळ्या रंगाचा बर्मोडा घातला आहे . तो मराठी भाषा बोलतो तसेच समोरील दात पडलेला आहे . या मुला बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे फोन – 022-27452444 किंवा पोहवा एस . के. चिकणे यांच्याशी संपर्क साधावा .