भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन रायगडात बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे रक्तदान, आरोग्य शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.
अलिबागेत स्मरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अलिबाग मधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना माजी उपनगराध्या अॅड. मानसी म्हात्रे, सोबत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे.
पनवेलमध्ये प्रार्थना

पनवेल येथे आ.बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
मेणबत्ती रॅली

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी 5 डिसेंबर रात्री 11 च्या सुमारास खांदा वसाहतीच्या मूलगंध कुटी विहारातून अभिवादन करण्याकरता मेणबत्ती रॅली काढण्यात आली.
उरणमध्ये महामानवाला वंदन

उरण बौद्धवाडा येथील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे, माजी नगराध्यक्ष रवी भोईर, सायली म्हात्रे, नरेश रहालकर, संदेश ठाकूर, घन:श्याम कडू, प्रकाश कांबळे, धनंजय भोर, सतिश गवई, दिनेश हळदणकर, सुरेश पोसतांडेल, मधुकर भोईर, सचिन नांदगावकर, सुनील चौधरी, महेश भोसले, हरिष जाधव, विजय पवार, संजय पवार, जगदीश म्हात्रे, सामिया बुबेरा, तृप्ती म्हात्रे, नगरसेवक राजू ठाकूर, नंदू लांबे आदींसह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली.
शिवसैनिकांचे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस शिवालय येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नितीनसावंत, उत्तम कोळंबे, अॅड.संपत हडप, विवेक दांडेकर, भालचंद्र जोशी, संतोष पाटील, विश्वनाथ बोराडे, मंगेश राऊत, अविनाश भासे, एकनाथ कोळंबे, दिनेश भासे, अरुण निघोजकर, समीर साळोखे, विनायक पाटील, तेजस इंगळे, रघुनाथ कोळंबे, उपसरपंच ज्ञानेश्वर तुपे, जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर भालिवडे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रवादीतर्फे अभिवादन!

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा तर्फे पनवेल मध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले. सामुदायिक बुद्ध वंदना घेतली.
ऐनघर महापरिनिर्वाण दिन साजरा

ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कलावती कोकळे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेंद्र कोकळे, अनिल शिंदे, अंकिता शिंदे, कर्मचारी उत्तम जाधव, कांचन ठमके, ज्योत्स्ना दळवी, सुवर्णा पवार, ग्रामस्थ उपस्थित होते.
वडघर येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति निमित्त घेण्यात येणार्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या रायगड विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सरस्वती विद्यालय वडघर मुद्रे विद्यालयात अत्यंत उत्साहाने संपन्न झाली. आंबेडकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन प्रतीवर्षी संस्था स्तरावर केले जाते. विविधांगी विषयावर आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी अत्यंत उत्साहाने अभ्यासपूर्ण तयारी करून सदर स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी इयत्ता आठवी साठी कवयित्री शांता शेळके यांची मला आवडलेली कथा, इयत्ता नववीसाठी जीवन गाण्याच्या कवयित्री शांता शेळके, दहावी साठी कवयित्री शांता शेळके यांचे साहित्यातील योगदानहे विषय होते.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे, मनोज सुतार,अमोल तोडकर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे प्रास्ताविक विट्ठल पवार यांनी केले, सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश भेदाटे यांनी केले. इयत्ता आठवी ते दहावी इयत्तासाठी असलेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिक्षक राजेश नथुराम शिंदे व अनिल वैजनाथ नाचपल्लै यांनी केले. सदर स्पर्धेत इयत्ता आठवीतून माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची श्रेया मरवडे प्रथम,नववीतून माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची कस्तुरी अरुण देवकर प्रथम, दहावितून सरस्वती विद्यामंदिर वडघर विद्यालयाची भूमी धुमाळ यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.अंतिम फेरीसाठी प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी संस्था पातळीवर सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख व शिक्षकांनी नियोजन केले.या स्पर्धेसाठी उपस्थित परीक्षकानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक व सहभागी स्पर्धकांचे मूख्याध्यापक संस्था पदाधिकारी ,शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
लोणेरे येथे अभिवादन
लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला 66 व्या महापरिनिर्वाहण दिनानिमित्त अभिवादन करताना रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे सोबत स्वप्नील शिर्के, मांगरूळ येथील महिला सुवर्णा लोखंडे, अपर्णा लोखंडे, प्रिया लोखंडे, रोहिता लोखंडे आदी दिसत आहेत.