| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील पाणदिवे येथील रहिवासी सारा विकास पाटील वय 13 वर्ष ती एस.बी.पी.सिबर्ड दिव्यांग मुलांची शाळा बोरी येथे शिक्षण घेत आहे. साराने दिव्यांगावर मात करत विजय विकास सामाजिक संस्थेच्या जलतरण स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक काढत वाय.एम.सी.ए. बेलापूर येथील जलतरण स्पर्धेत तीन प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. साराने नागपूर येथे पार पडलेल्या स्पेशल ऑलंपिक राज्यस्पर्धेत भाग घेतला.
तिचा लहान गट सोडून तिला 16 ते 21 वयोगाटात स्पर्धेसाठी उतरविण्यात आली. या स्पर्धेत तिने फ्रिस्टाईल व बॅकस्ट्रोक प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला. तिच्या यशाबद्दल शिक्षकांनी, गावातून तालुक्यातील शिक्षकांनी, पालकांनी, नातेवाईकांनी अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.