सरेकर आळी कबड्डी प्रिमियर लिग स्पर्धा

महिलांमध्ये राजमाता जिजाऊ तर मुलांमध्ये विरेश्‍वर महाराज कबड्डी संघ प्रथम
। महाड । वार्ताहर ।
शहरातील सरेकर आळी येथे आळी मर्यादित प्रितम उमासरे पुरस्कृत लहान मुले, महिला तसेच तरूण मुलांच्या कबड्डी स्पर्धा रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या. तीन गटामध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेत लहान गटात कौल फायटर संघाने प्रथम तर आंघोळ वारिअर्स संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तर महिला संघात झालेल्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने शिवसाई संघाला दोन्ही सामन्यात पराभुत करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले. तर मोठ्या गटात विरेश्‍वर महाराज संघाने जाकमाता संघाला पराभूत करून प्रथम क्रमांकाचे आकर्षक चषक पटकाविले.
लहान गटातील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले. तर मोठ्या गटात विरेश्‍वर महाराज संघाने जाकमाता संघाला पराभूत करीत चषक पटकाविला. या स्पर्धेत उत्कृष्ट चढाई म्हणून साहील भऊड तर उत्कृष्ट पकड म्हणून निखिल पेंढारी, उत्कृष्ट खेळाडू म्हणून कौस्तुभ मोरे यांची निवड करण्यात आली. या सर्व विजयी स्पर्धकांना प्रीतम उमासरे, सुरेश पवार, संतोष पवार, अजित मपारा, श्री. पिलविलकर, रामचंद्र धाडवे, राज पवार, सौ. ओंबळे,भारती चव्हाण, शोभा उमासरे या मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण स्पर्धा मुकुंद भऊड, समीर जाधव, मंगेश पांडे, संतोष आंब्रे, प्रविण उमासरे, महेश भऊड, सुनिल दाभेकर, बाळू उमासरे, समीर दवंडे, अजय चव्हाण, राजेश भुवड यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. शेवटच्या अंतिम सामन्यांसाठी पंच म्हणून महाड कबड्डी असो.चे गणेश पाटील, पंकज पवार यांनी काम पाहिले. तर शिवासाई कबड्डी संघ सरेकर आळीच्या या सर्व खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version