सरगमचा पदग्रहण समारंभ संपन्न

। पनवेल । वार्ताहर ।

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा नवीन टीमचा पदग्रहण सोहळा नुकताच पनवेल येथील गोखले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मल्टिपल कौन्सिल चेअरमन नितीन शेट्टी तर, विशेष अतिथी म्हणून द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष म्हणून मानदा पंडित याना शपथ देण्यात आली. तर, सचिव पदी प्रेमेंद्र बहिरा, खजिनदार धवल शहा, आणि इतर सभासदांनी विविध पदांसाठी शपथ घेतली.

नवनिर्वाचित अध्यक्ष मानदा पंडित यांनी क्लबच्या अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि दरवर्षीच्या उपक्रमांसोबत नवीन व्हिजन सेंटर, अन्नदान सारखे उपक्रम घेणार असल्याचे सांगितले. याच समारंभात प्रवीण सरनाईक यांचे हस्ते मधुरा राजीव, आदित्य दोशी, प्रकाश भारद्वाज आणि हिमांशू कुलकर्णी या नवीन सभासदांना क्लबच्या सभासदत्वाची शपथ दिली. यावेळी स्वाती गोडसे यांनी मागील वर्षी उत्तम काम केल्याबद्दल संविदा पाटकर, अलकेश शहा, सुयोग पेंडसे, संजय गोडसे, प्रेमेंद्र बहिरा, जयेश मणियार, धवल शहा, प्रदीप भट्टाचार्य, मधुरा राजीव, सुनील देशपांडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच, मानदा पंडित याना लायन ऑफ द इयर या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल मुकेश तनेजा, मोहिनी तनेजा, विजय गणात्रा, सत्यपाल चुघ, भावना रुईया, संजय रुईया, संदीप म्हात्रे, रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, मदन गोवारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version