इनरव्हील आँफ खोपोलीच्या अध्यक्षपदी सारिका धोत्रे

महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्याचा केला संकल्प
। खोपोली । प्रतिनिधी ।
सामजिक कार्यात सर्वात पुढे असणारी महिलांची संस्था इनरव्हील आँफ खोपोलीच्या अध्यक्षपदी सारिका धोत्रे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून रोटरी क्लबच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पदग्रहन सोहळा संपन्न झाला असून महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रम राबविण्यासाठी खोपोलीतील इतर सामाजिक संस्था, रोटरी क्लब खोपोली, लायन्स क्लब, इंट्रॅक्ट क्लब आणि नगरपालिका यांचे सहकार्य घेत सरकारी योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा धोत्रे यांनी सांगितले.

खोपोलीत गेल्या ३६ वर्षापासून इनरव्हील क्लब ही महिलांची संघटना कार्यरत असून दरवर्षीप्रमाणे नवीन अध्यक्ष निवडून काम करण्याची प्रथा कायम ठेवत मागील वर्षाच्या अध्यक्षा सुचिता जोशी यांच्या पदाचा कार्यकाल संपल्यावर सन २०२२-२३ या वर्षासाठी सारिका धोत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली असून या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या माहेरवाशीण संघटनेच्या प्रभा शिर्के,खालापूर नगरपंचायतीच्या मा.नगराध्यक्षा तथा विद्यामान नगरसेविका शिवानी जंगम, इनरव्हील स्थापनेपासूनच्या सदस्या कुंदा ताई कुलकर्णी, शांतीताई जोशी, अलकाताई साखरे, माजी अध्यक्षा सुचिता जोशी डॉ रश्मी टिळक, खजिदर जयश्री क्लोशी मिनील चौधरी सेक्रेटरी श्रीदेवी राव आदि उपस्थित होत्या. मा.अध्यक्षा सुचेता जोशी यांनी मागील वर्षात केलेल्या कामांची माहिती दिल्यावर नवनिर्चित अध्यक्षपदाचा सारिका धोत्रे यांनी पदभार स्विकारला असून व्हाईस प्रेसिडेंट- श्रीदेवी राव, मा.अध्यक्षा सुचेता जोशी, सचिव जयश्री कलोशी, खजिनदार वैशाली गांधी, आयएसओ – मधुमिता पाटील पत्रकार दिना शहा सीसी विनया हर्डीकर सदस्य-अनिषा बिवरे,सपना चौधरी, जयश्री दोडिया, प्रीती शह, एकता भादोरिया यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

गेल्या 36 वर्षांपूर्वी इनरव्हील क्लबची खोपोलीत स्थापना झाली आज त्याचे वटवृक्ष झाले आहे. माझ्यावर विश्वास दाखवून सेवा करण्याची संधी दिली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत महिलांसाठी मुलींसाठी वेल्फेअर प्रोग्रॅम, लीगल हेल्प, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, पर्यावरण संदर्भात प्रोजेक्ट्स- रेन वॉटर हार्वेस्टिंग चे महत्व- पाणी वाचवा, स्वच्छ पिण्याचे स्वच्छ पाणी, झाडे लावा मेघा प्रोजेक्ट, सोलार पॉवर सोलार एनर्जी त्यांचे महत्त्व, प्लास्टिक आणि पेपर चे कमी वापर, पुनर्वापर, मेडिकल प्रकल्प, ॲनिमिया व कॅन्सर अवेअरनेस त्याची लक्षणे व कारणे त्यावर उपाय, प्रौढ साक्षरता, ई- शिक्षण, शाळाबाह्य मुलांना शिक्षण, शाळेतील मुलांना पाण्याचे, पेपर चे महत्व पटवून ते कसे वाचवता येईल यावर मार्गदर्शन करणे व खोपोलीतील सर्व शाळा झीरो वेस्ट स्कूल बनवणे आदि उपक्रम रबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा सारिका धोत्रे यांनी सांगितले.

राजकारणात आम्ही खुर्चीसाठी भांडतो पण इनरव्हील क्लबच्या महिला स्वतःपद दुसऱ्या महिलांना हसतमुखाने देताच याबद्दल मी भावूक असल्याचे मा.नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी सांगत महिलांचे असंख्य समस्या आपल्या तालुक्यातही आहेत. आपल्या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मी हवी मदत करण्याचे अश्वासन देत सारिका धोत्रे उच्च शिक्षित, कलाक्षेत्रात नावाजलेले नाव असल्याचे जंगम यांनी कौतुक केले.

Exit mobile version