सर्पमित्राने दिले १० फुटी अजगरला जीवदान

पोलिसांच्या सहकार्याने अजगराला सोडले जंगलात
। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड शहरातील अलकापुरी येथे गजानन गाणार यांच्या घरात आलेल्या १० फुटी अजगरला सर्पमित्र संदीप घरत ने शिताफीने पकडून मुरुड पोलिसांच्या सहकार्याने रात्री उशिरा गारंबी जंगलात जाऊन सोडून दिले.

अलकापुर येथे गजानन गाणार यांच्या घरासमोर मध्यरात्री १२ वाजता अजगराला येताना शेजारी संकेत सतविडकर ने पाहीले अजगर घरात शिरत होता. त्यावेळी संकेत ने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. सर्पमित्र संदीप घरत ने तातडीने घटनास्थळी पोचले व गाणारांच्या घराच्या सर्पण ठेवण्याच्या खोलीत अडगळीत बसलेल्या अजगराला दिड तासाच्या अथक प्रयत्नाने पकडले.

त्यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला परंतु कोणिही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रात्री पेट्रोलींग करिता असलेल्या मुरुड पोलिसांना संपर्क साधला असता पोलिसांनी तात्काळ सहकार्य करुन रात्री २:३० वाजता या अजगराला गारंबी जंगलात जाऊन सोडून दिले. मुरूड पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version