। महाड । प्रतिनिधी ।
महाडचे ग्रामदैवत असलेल्या विरेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सरपंच दिलीप पार्टे यांनी या पदाचा राजिनामा दिला आहे. वीरेश्वर महाराजांचा छबिनोत्सव तोंडावर आलेला असतानाच पार्टे यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिलीप पार्टे हे गेली आठ वर्ष देवस्थानचे सरपंच म्हणून काम पाहात होते. तत्पूर्वी जवळपास तीस वर्ष त्यांचे पिताश्री स्व. दगडूशेठ पार्टे यांनी सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. दिलीप पार्टे यांच्या सरपंचदाच्या राजिनाम्यामुळे संपूर्ण पंचकमिटी आपोआप बरखास्त झाली आहे. त्यामुळे छबिनोत्सवापूर्वी नवी पंच कमिटी गावकीच्या बैठकीत नेमावी लागेल. विद्यमान उपसरपंच रमेश तथा नाना नातेकर यांची सरपंचपदी नेमणूक करण्यात यावी अशी इच्छा दिलीप पार्टे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.