| उरण | वार्ताहर |
हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद जयवंत कोळी यांना जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (1959 चा मुबंई अधिनियम कर. 3) चे कलम 14 ज(3) नुसार न्यायालयात सुरू असलेल्या ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 44/2021 मधील अर्जदार हरिश्चंद्र कोळी, राज शेवेकर, आशा कोळी, गौरव कोळी व सामनेवाले परमानंद जयवंत कोळी, ग्रामविकास अधिकारी यांना याप्रकरणी 24 जानेवारी रोजी परमानंद कोळी यांना हनुमान कोळीवाडा सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे. सरपंच परमानंद कोळी यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रायगड यांनी जाहीर केल्याने उरण तालुक्यात गैरकारभार करणार्या सरपंच व अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.