| रसायनी | राकेश खराडे |
चौक हद्दीतील तुपगाव ग्रामपंचायत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत रवींद्र कुुभार हे भरघोस मतांनी निवडून आले. परिसरातील नागरिकांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आठवड्याअगोदरच थेट सरपंच म्हणून निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच रवींद्र कुंभार यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चौक तुपगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या गवतामुळे वळणावर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन श्री. कुंभार यांनी स्वतः उभे राहून दोन्ही बाजूला वाढलेले धोकादायक गवत काढले. तसेच या रस्त्यावरील वीजखांबावरील बंद असलेले दिवे काढून त्याजागी नवीन दिवे बसविले. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अपंग बांधवांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना मिठाई वाटप केली.