गोगावले गट -३५, मविआ १५
। महाड । जुनेद तांबोळी ।
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आजही आ. भरत गोगावले याचे वर्चस्व असल्याने ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी नंतर अधोरेखित झाले आहे ५३ ग्रामपंचायत मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब शिंदे गट कडे ३१ पंचायत तर महाविकास आघाडी कडे १५ पंचायत व १ ग्रामविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे.
पंचायत मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. मंगळवारी (दि.२०) मतमोजणी सुरू झाली असून चार फेरीत ५३ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतींवर गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे. गोगावले यांच्या ताब्यात अप्पर तुडील, नांदगाव बु ,पारमाची, रानवडी, सवाने,आदीस्ते, वराठी, वारंगी वाघोली, धामणे, कुसगाव ,शिरवली, लोअर तुडील, बीजघर, घावरेकोंड, पणदेरी, देशमुख कांबळे, तलीये, कारंजाडी, आडी,उंदेरी, करंजखोल, कोळेसे , नाते, वीर,साकडी, कावळे तर्फे विन्हेरे, नडगाव तर्फे बिरवाड, नातोंडी , ताम्हाणे.
महाविकास आघाडीकडे आबवडे, वाळसुरे, सावरट, कोथेरी, लाडवली,वरंध, गोठे, मोहप्रे, गांधारपार्ले, दासगाव,वहूर, कोल, बारसगाव, या तर महाविकास आघाडी च्या पाठींब्या वर भाजप ची सत्ता चिभावे ग्रामपंचायत वर निर्वादीत आली आहे त्याच प्रमाणे गावविकास पातळीवर जुई बु ची सत्ता आली असून या ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी काँग्रेस कडे होती.
वरंध ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी चे वर्चस्व हे गोगावले याच्या प्रतिष्ठेला ठेच लागल्या सारखे आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधील निकाल आत्मपरीक्षण करणे क्रमप्राप्त बनले आहे या निकालानंतर गोगावले गटाने जोरदार घोषणाबाजी, गुलाल उधळूण आनंदोत्सव साजरा केला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.