सर्वद फाऊंडेशन पुरस्कार

। मुंबई । प्रतिनिधी ।

समाजातील कला, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य, संस्कृती, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी मुंबईमधील ख्यातनाम अशा सर्वद फाऊंडेशनच्या विद्यमाने जीवनगौरव आणि राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पुरस्कार नुकतेच विक्रोळी येथील अभय इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात प्रदान करण्यात आले. बंगळुरू येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साईनाथ सतनूर यांना जीवनगौरव, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक योगेश वसंत त्रिवेदी व अशोक शिंदे यांना राज्यस्तरीय सर्वद स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आवाजाच्या दुनियेतील शहेनशहा आणि दूरदर्शन, आकाशवाणी वरील ख्यातनाम वृत्तनिवेदक दीपक वेलणकर, बोरीवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोर्‍हाडे यांना राज्यस्तरीय सर्वद स्टार उत्कृष्ट लेखक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. याशिवाय वर्षा कुवळेकर, संजय गवांदे अशा अनेक साहित्यिकांना प्रख्यात स्पाईन सर्जन डॉ. साईज्योत राऊत आणि सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती शुभदा रामसिंग यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी शिवभक्त राजू देसाई, सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम, दैनिक कृषिवलच्या व्यवस्थापकीय संचालिका सुप्रिया पाटील, संत साहित्याचे अभ्यासक वामन देशपांडे, निला तुळपुळे, शुभांगी गाडगीळ, सुरेखा पाटील, लता गोवीळकर, निलम वडके आदी उपस्थित होते.

Exit mobile version