सताणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती

। पेण । प्रतिनिधी ।

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया 1956 या पक्षाच्या पेण तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण सताणे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा संकल्प लक्ष्मण सताणे यांनी केला असून पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, कार्याध्यक्ष एम.डी. कांबळे व जिल्हाध्यक्ष अशोक गोतरणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पेण तालुक्याच्या अध्यक्षपदी सर्वांच्या अनुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी भगवान लाटे, सरचिटणीसपदी मिलिंद कांबळे, कोषाध्यक्षपदी सुभाष कांबळे, सह कोषाध्यक्षपदी दिगंबर सताणे, संघटकपदी राजेंद्र कांबळे, रविंद्र गायकवाड, विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version