। तळा । वार्ताहर ।
राष्ट्रीय छावा संघटनेच्या तळा तालुका अध्यक्ष पदी विकी किसन जंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागीय उपाध्यक्ष तथा दक्षिण रायगड अध्यक्ष राजू मोहन सुतार यांच्या अध्यक्षतेखाली शहराची ग्रामदेवता चंडिका देवी मंदिरात घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात विकी जंगम यांची तळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी सुनील शिंदे, रूपेश कांबळे, अनिकेत यादव,तेजस चव्हाण, किरण सातांबेकर, रूतिक तळेकर, शुभम राऊत, देविदास नास्कर, साहिल राऊत, विरेंद्र सावंत, मयुरेश नास्कर यांसह तळा तालुक्यातील सदस्य व दक्षिण रायगड जिल्हाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.