| रेवदंडा | वार्ताहर ।
पिढयानंपिढया रोजदांरी, व्यवसायाने निगडीत असलेलं पिढयानंपिढयाचं अतुट नातं सातारा जिल्हांतील अनेक गावातील अनेक कुटूंब प्रतिवर्षी म्हसोबा यात्रेच्या निमित्ताने जोपासले आहे. पुर्वीच्या काळी शेतीचा हंगाम संपला की, दिवाळीच्या मुर्हूताने सातारा जिल्हांतील अनेक गावातील कुटूंबे रोजदांरी व व्यवसायाच्या निमित्ताने तळ कोकणात महाबळेश्वर, पोलादपुर, रोहा मार्गे थेट रेवदंडा-थेरोंडा पर्यंतच्या गावागावातून रोजदांरी, करत फिरत होते.
गावागावातून कुटूंबाच्या लवाजाम्यासह पायी चालत गाढव, डुकर यांच्या संगतीने धार लावणे, गायी म्हशीच भद्रावण करणे आदी रोजदांरी व व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न घेत असत. सातारा जिल्हांतील या हिंदु कोलाटी जातीच्या कुटूंबाचे येथे पिढयानंपिढयाचं नातं होत. पिढयानंपिढया चालत असलेल्या रितीरिवाजाप्रमाणे ही कुंटूबे ठिकठिकाणी गावागावातून रोजदांरी, व्यवसाय करून पुर्वी थेरोंडा येथे एकत्रीत येत असत. थेरोंडा आगलेची वाडी नजीकच राहूटी उभारून या मध्ये ही कुटूंबे वस्तीस राहत असत, तेथेच हिंदू कोलाटी जातीच्या मोरे, जावळे, लाखे, लघू जावळे आदी आडनावाच्या कुटूंबाचे कुलैदवत मंदिर अदयापी आहे. पुर्वी रोजदांरी व्यवसायासाठी आलेली सातारकर कुटूंबे राहूटी उभारून वस्ती करत असावे, त्यामुळे त्यांचे कुलैदवत हे मंदिर एका पत्राशेड मध्येच होते. मात्र सध्या पत्राशेड मधील मंदिराचा गाभारा तसाच ठेवीत मंदिराचे जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे मंदिर सातारा जिल्हांतील शिरवळ, कुदाळ, रहमतपुर, भोर, एंखाबे आदी अनेक गावातील कुटूंबाचे कुलदैवत असून त्यांचे भक्ती व श्रध्दास्थान आहे व जागृती देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आहे. बदलत्या काळानुसार सातारा जिल्हांतील गावागावातील कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बदलले, रोजदांरी व व्यवसायामध्ये बदल झाला. परंतू या साताराकर गावागावातील कुटूुंबाचे म्हसोबा देवस्थानाची श्रध्दा व भक्ती तसभूरही कमी झाली नाही.
अदयापी सातारा जिल्हातील गावागावातील हिंदू कोलाटी जातीच्या मोरे, जावळे, लाखे, लघू जावळे आदी आडनावाची कुटूंबे प्रतिवर्षी म्हसोबाचे यात्रेच्या निमित्ताने येथे दहा, बारा दिवस राहूटी उभारीत वस्तीत राहतात. सध्यस्थितीला अनूसरून ते पायी चालत न येता, वाहनाने येथे येतात व रितिरीवाजाप्रमाणे पिढयानंपिढया सुरू असलेले धार्मिक विधी येथील म्हसोबा मंदिरातील देवाशी पार पाडतात.
यावर्षी सुध्दा सातारा जिल्हांतील शिरवळ, कुदाळ, रहमतपुर, भोर, एंखाबे आदी अनेक गावातील हिंदू कोलाटी जातीच्या मोरे, जावळे, लाखे, लघू जावळे आदी आडनावाची पंचवीस कुटूंबाचे अंकुश मोरे यांचे सहपरिवारासह तिनशे जणांसह 24 जानेवारीला आगमन झाले असून थेरोंडा बेडेकर आळी नजीकच्या शेतात तळ ठोकून राहूटी उभारून वस्तीस आहेत. रितीरिवाजाप्रमाणे मंगळवारचे दिवशी थेरोंडा देवस्थानात जत्रेचं नियोज केले होते, तत्पुर्वी या कुटूंबाने सहपरिवारासह रेवदंडा समुद्र किनारी जाऊन देवाचे स्नान आदी धार्मिक विधी पार पाडला, त्यानंतर या कुटूंबाने जत्रेच्या निमित्ताने थेरोंडा येथील मंदिरात धार्मिक विधी पार पाडला व देवाचं मानपान वर्गैरे पुर्ण केले.
येत्या सहा फेब्रुवारीला ही कुटूंबे खेड रत्नागिरी येथे प्रस्थान करणार आहेत, तेथील देवीच्या मानपानानंतर पुनस्यः सातारा जिल्हांतील आपआपल्या गावात जातील. दरवर्षी सातारा जिल्हांतील विविध गावातून हिंदु कोलाटी जातीच्या मोरे, जावळे, लाखे, लघू जावळे आदी आडनावाची कुंटूबे येऊन म्हसोबा व रेवदंडा-थेरोंडा मध्ये धार्मिक विधी पार पाडतात. एक आगळ वेंगळ नातं पिढयानंपिढया रितीरिवाजाप्रमाणे सातारा जिल्हातील ही गावे रेवदंडा व थेरोंडा गावाशी जोडून आहेत, मात्र येथील संबधीताना या बाबाीशी कोणतेही सोयरसुतक नाही असेच दिसून येते. थेरोंडा येथील म्हसोबा देवस्थान हे आमचे कुलदैवत आहे, पिढयानंपिढया रितीरिवाजाप्रमाणे म्हसोबाचे यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक पार करण्यासाठी रेवदंडा व थेरोंडा येथे आम्ही येत असतो, असे यांचे प्रमुख मार्गदर्शक व नेतृृत्व करत असलेल्या अंकुशराव मोरे यांनी सांगितले.