सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

। नवी दिल्ली । प्रतिनिधी ।

दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ पुन्हा सत्तेत परतले असून, केरळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी अखेर व्ही.डी. सथीसन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दहा दिवस सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे तिरुवनंतपुरमपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय हालचालींना अखेर विराम मिळाला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती.

Exit mobile version