रस्ता दुरुस्तीसाठी साथी हाथ बढाना; महाजने ग्रामस्थ एकवटले

सामुहिकरित्या बुजविले खड्डे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील बेलोशी ते महाजने रस्त्याची अवस्था बिकट झाली असताना रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्ता दुरुस्त करण्यास उदासीन ठरला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढाकार घेत महाजने येथील ग्रामस्थ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकवटले आहेत. ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळींनी एकत्र येऊन रस्त्याची दुरुस्ती श्रमदानातून केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

तालुक्यातील महाजने – ते बेलोशी हा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करीत महाजने येथील ग्रामस्थ व महिला मंडळांनी एकत्र येऊन खड्डे बुजविण्यास सुरूवात केली. श्रमदानातून खडी, सिमेंटद्वारे रस्त्यावरील लहान मोठे खड्डे बुजवले. खड्ड्यांमुळे गावांकडील एसटीच्या फेर्‍या बंद होण्याची भीती अधिक आहे. सकाळपासून दुपारपर्यंत एक किलो मीटर अंतरावर पडलेले खड्डे बुजविले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेेले गवत, व झुडूप तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

Exit mobile version