| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील ग्रामपंचायत सातिर्जेला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले. हे मानांकन प्रमाणपत्र मिळविणार्या जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी एक सातिर्जे ग्रामपंचायत असल्यामुळे गावाच्या विकासाची जबाबदारी अधिकच वाढली असल्याचे सरपंच प्राजक्ता खडपे यांनी सांगितले.
बुधवार (दि.11) सातिर्जे ग्रामपंचायतीला डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सरपंच प्राजक्ता खडपे, उपसरपंच अॅड. उमेश सदस्य दिपक राऊळ, सुधाकर चिंबुलकर, रुपाली कदम, पल्लवी आग्रे, कीर्ती वाहीम, दिपाली बोंबटकर, ग्रामसेवक पूजा पाटील व ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुजित ठाकूर, मंदार बोंबटकर, प्रवेश पाटील यांचे सहकार्य लाभले. हे मानांकन प्रमाणपत्र सरपंच प्राजक्ता खडपे, ग्रामसेविका पूजा पाटील यांनी स्वीकारले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ग्रामपंचायत सातिर्जेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी ग्रामपंचायत सातिर्जेचे अभिनंदन केले.