| रसायनी | वार्ताहर |
रसायनीत वीजेच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मोहोपाडा, रसायनी, आपटा परीसरामधीलु नागरिकांमध्ये तीव संताप दिसून येत होता. महावितरणाने याची गांभीयाने दखल घेत पनवेल ग्रामीण उपविभागअंतर्गत मोहोपाडा, रसायनी परीसरात तांत्रिक सुधारणांची कामे हाती घेतलेली असून ती समाधानकारकपणे पूर्ण होत आहेत.
यात 220 केव्हीचे जाळे विस्तारीत करणे, 18 किमी नवीन उच्चदाब वाहिनी टाकणे उणे 10 किमी. जूने कंडक्टर बदलणे, रोहित्र व शहरातील लघुदाब वाहिनेचे जुणे पोल काढून त्याजागी नवीन पोल लावणे. आठ किमी लघुदाबवाहिनी जूने करकटर बदलणे. वितरण प्रणालीमध्ये अडथळा आणत असलेल्या झाडांच्या फांदयाची छाटणी करणे, चीन इन्यू लेटर्स बदलणे आदी कामाचा समावेश असून कार्यकारी अभीयंता लटपटे यांच्या मार्गदर्शंनाखाली उपकार्यकारी अभियंता राखसाहेब, सहाय्यक अभीयंता गलांडेसाहेब, कांबळेसाहेब यांनी विजेला अडसर ठरणा-या समस्या मार्गी लावण्यासाठी परिश्रम घेतले. मोहोपाडा विजवितरण कार्यांलयाअंतर्गंत सहाय्यक अभियंता गलांडे यांच्याकडून परिसरात विजसमस्येवर तोडगा काढला जात असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.






