सतीश तुपे सेवानिवृत्त

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मंगळवारी (दि.30) पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे व पत्नी श्रद्धा तुपे यांचा शुक्रवारी (दि.26) जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला.

सतीश तुपे हे युनियनच्या प्रत्येक आंदोलनात नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्‍न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक प्रश्‍न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो, तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्‍वासराव, विजय पंदीरकर, आप्पा सूर्यवंशी, राजेश वाधवाणी, इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली.

Exit mobile version