नि:स्पृह सेवेचे सात्विक समाधान- वैशंपायन

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

समाजात किंवा शैक्षणिक क्षेत्रात नि:स्पृह, निरपेक्ष व आत्मियतेने काम केले तर त्याचे सात्विक समाधान व आनंद मिळतो. निराधार बालकांना आईचे प्रेम व वात्सल्य देतांना आम्हाला देव भेटल्याचा आनंद होतो, असे भावूक विचार अलिबाग येथील वात्सल्य अनाथाश्रम, सल्लागार गीताताई वैशंपायन यांनी मांडले.

श्रीवर्धन येथील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम करणार्‍या व्यक्तींच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित केले जाते. यावर्षी गीताताई वैशंपायन व समन्वयक सुचेता पटवर्धन, शांतीलाल जैन, राजेंद्र भोसले, नितीन सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार आनंद जोशी, शर्मिला जोशी, प्रशांत सावंत व वासिम फकजी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत

प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कल्याणी नाझरे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय नॅकचे समन्वयक प्रा.वाल्मिक जोंधळे यांनी करुन दिला. यावेळी पीएचडी प्राप्त प्रा.डॉ.निलेश चव्हाण, प्रा.डॉ. योगेश लोखंडे, प्रा. दिपाली पाठराबे व प्रा.नवज्योत जावळेकर यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. याचवेळेस प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी, उप प्राचार्य किशोर लहारे, प्रा.वाल्मिक जोंधळे, श्री.उल्हास खोपकर, श्री.कमलेश दसरे यांचाही सन्मान वैशंपायन, पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. सुचेताताई पटवर्धन यांनीही मनोगतातून महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतूक केले. वासिम फकजी, प्रशांत सावंत, आनंद जोशी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, शांतीलाल जैन, नितीन सुर्वे यांनीही मनोगत व्यक्त केेले.

सोहळ्यात सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, परीक्षा विभाग, रासेयो विभाग, महिला विकास विभाग, ग्रंथालय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विकास समिती सदस्य शांतीलाल जैन यांनी मातोश्री कोकीबाई जैन यांच्या स्मरणार्थ दिलेले पुढील चषक 1) जेण्ट्स जनरल चॅम्पियन : जैन हर्ष किशोर, 2) लेडीज जनरल चॅम्पियन : सायेशा इक्बल मनेर व 3) अकॅडेमीक जनरल चॅम्पियन : आयेशा इक्बाल मनेर, नितीन सुर्वे यांनी प्राचार्य, डॉ.श्रीनिवास गोसावी यांच्या स्मरणार्थ पदवी, पदव्युत्तर प्रदान केलेले.

तृतीय वर्ष कला प्रथम : कु.चांदोरकर सुविधा मनोहर. तृतीय वर्ष वाणिज्य प्रथम : खान मरयम मसूद. तृतीय वर्ष विज्ञान प्रथम : दाभिलकर खलील इब्राहिम. एम. कॉम प्रथम: गजाली हिना शहानूर या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच दादासाहेब भोसले यांच्या स्मरणार्थ राजेंद्र भोसले यांचा Best outgoing student ही कु. शिल्पा ब. बोराणा ला प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचालन मृण्मयी भुसाणे व नवज्योत जावळेकर यांनी केले तर सौ. दिपाली पाठराबे यांनी आभार प्रदर्शन केले. या सा-या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी पंडित, सचिव सर डॉ. एम.एस. गोसावी, एच.आर.डायरेक्टर प्राचार्या डॉ. देशपांडे, संस्थेचे अन्य पदाधिकारी व महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.

Exit mobile version