| चिपळूण | प्रतिनिधी |
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे प्राथमिक शाळेने निर्विवाद वर्चस्व राखले. गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडीक सभागृहात सह्याद्री टॅलेंट बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत प्राथमिक शाळा सावर्डेचे अर्णव अमोल सुर्वे याने प्रथम क्रमांक, श्रवण राकेश भुवड द्वितीय तर पावनी नागेश नायक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, मानसिंग महाडीक, महेश महाडीक, प्रशांत निकम, अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.







