बेटी बचाओ; बेटी पढोओसाठी टेम्पोवाला करतोय जनजागृती

उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील उरण शहरातील पालवी हॉस्पिटलसमोर राहणारे सामाजिक कार्यकर्ते टेम्पोवाले दिलीप मदन जाधव हे आपल्या टेम्पोवर बेटी बचाओ; बेटी पढोओ असे पेंट करून गेली 12 वर्षा पासून उरण तालुक्यात जनजगृती करीत आहेत. महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कृपेने मी हे काम करीत आहे. अजूनही काही ठिकाणी मुलीला जन्म देणे कमी समजतात. मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत त्या विषयी जनजागृती मी करीत आहे असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी सांगितले.

Exit mobile version