| म्हसळा | वार्ताहर |
नाबार्ड आणी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना बचतीचे धडे देण्याचा उपक्रम संपूर्ण तालुक्यात सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यू इंग्लिश स्कूल पाभरे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. म्हसळा शाखेचे शाखाधिकारी मंगेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमांस बँकेचे वसुली अधिकारी सुरेंद्र शिर्के, विजय पयेर, संदेश पाटील, मंगेश कदम, शाळेचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाखाधिकाऱ्यांनी आर्थिक साक्षरते बद्दल मार्गदर्शन करून संगणक व ऑनलाईन कामाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना जर त्यांच्या घरून काही रक्कम स्वखर्चाला दिली तर त्यातून काही रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवल्यास ती रक्कम ऐन वेळी येणाऱ्या अडचणीला उपयोगी पडू शकते, असेही मुंडे यांनी सांगितले.