हॉकी स्पर्धेसाठी सविता पुनिया कर्णधारपदी कायम

। बंगळूर । वार्ताहर ।

रांची येथे 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणार्‍या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सविता पुनिया कायम राहिली आहे. वंदना कटारिया उपकर्णधार असेल.

सहा संघाचा समावेश असलेली ही स्पर्धा पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता स्पर्धा आहे. भारतीय या स्पर्धेत अव्वल रहाण्याचे ध्येय बाळगले आहे. रांचीत होणारी ही स्पर्धा पॅरिस ऑलिंपिकच्या प्रवासासाठी महत्वाची आहे. संघातील प्रत्येक खेळाडू याच दृष्टीने विचार करत आहे आणि प्रयत्नही करत आहे, असे महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जान्नेक स्कोकमन यांनी सांगितले.

सर्व बाबींचा विचार करुन आणि सर्वांच्या क्षमता आणि कौशल्याचा विचार करुन आम्ही समतोल संघ निवडला आहे. सविता आणि वंदना या संघातून अनुभवी खेळाडू असून त्यांनी अनेक वेळा दडपणाच्या स्थितीचा सामना केलेला आहे, म्हणून त्यांच्यावर कर्णधार आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे स्कोकपन म्हणतात. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा सर्वोत्तम गोलरक्षक हा पुरस्कार सविताने सलग तिसर्‍यांदा नुकताच मिळवला आहे. तर भारताकडून सर्वाधिक 300 सामना खेणारी वंदना ही पहिली खेळाडू आहे.

संघ
गोलरक्षक: सविता पुनिया (कर्णधार), बिच्छू देवी खारीबम
बचावफळी: निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका
मधलीफळी: निशा, वैश्णवी फाळके, नेहा, नवनीत कौर, सलिमा ताटे, सोनिका, ज्योती, बेऊती डुंगडंग.
आक्रमक: लालरेमसियामी, संगीता कुमारी, दिपीका, वंदना कटारिया.
पात्रता स्पर्धेची गटवारी
अ गट : जर्मनी, जपान, चेक प्रजासत्तक
ब गट : भारत, न्यूझीलंड, अमेरिका
भारताचे सामने
13 जानेवारी : विरुद्ध अमेरिका.
14 जानेवारी : विरुद्ध न्यूझीलंड.
16 जानेवारी : विरुद्ध इटली.
Exit mobile version