। कर्जत । वार्ताहर ।
गोवा येथे झालेल्या एशियन बॉक्सिंग स्पर्धेत दिशांत भोईरची इंडीयन बॉक्सिंग टीम मधून निवड झाली होती. दिशांतने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत 14 वर्षीय 50 किलो वजनी गटात व्हिएतनाम सोबत फायनल राऊंड (8-6) अश्या गुणांनी फायनल जिंकून भारतीय संघाला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले. दिशांत हा पोई-वारे ग्रामपंचायत (नेरळ-कर्जत) परिसरात राहत असून त्याला आई-वडिलांचा नेहमी पाठिंबा असल्याचे त्याने सांगितले. तसेच, दिशांत हा माथेरान व्हॅली स्कूल वंजार पाडामध्ये शिकत असून त्याला प्रशिक्षक स्वप्निल अडुरकर व करण बाबरे यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.