| श्रीगाव | वार्ताहर |
सावली प्रकाशन समूहाच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि.10) दूसरे ऑनलाईन काव्यसंमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे तर स्वागताध्यक्षा अंजली गुंजोटे या होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण गोंदगे, प्रांजली काळबेंडे, मयूर पालकर, शरयु पाम्पट्टीवार व विकास पालवे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे सुत्रसंचालन स्मिता गायकवाड यांनी केले व प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. या संमेलनात कवयित्री विद्या मलवडकर, शितल बाविस्कर, आशा नष्टे, सोमेश्वर स्वामी, स्वाती सेलोकर, रेखा मालपुरे, श्वेता गोरे, सुजाता दोरगे, चंचल जाधव, सुवर्णा पाटुकले व दिगंबर वेदपाठक यांच्या कवितांनी संमेलनास रंगत आणली.
संमेलनाच्या पत्रिका व लिंक पाठवणे इत्यादी सर्व मोलाचे सहकार्य मयूर पालकर यांनी केले. ज्योती देशपांडे यांचे मार्गदर्शनपर मनोगत झाल्यानंतर सर्वांचे अंजली गुंजोटे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. हा ऑनलाईन संमेलन सोहळा आयोजित करण्यासाठी अंजली गुंजोटे, शरयु पाम्पट्टीवार तसेच सर्व ग्राफिक्सकार, सदस्य यांनी विशेष योगदान दिले.