। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शिवसेना शहरप्रमुखपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात होणार्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील आता सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार आहेत. राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बाजू ठामपणे घेणारे प्रसाद सावंत यांच्यावर कर्जत येथे 15 जणांच्या जमावाने हल्ला देखील झाला होता.