ऑस्ट्रेलिया विरूद्धचे वेळापत्रक जाहीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

बॉर्डर-गावसकर चषकापूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि भारत ‘अ’ यांच्यात दोन सामन्यांची चार दिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिना येथे खेळवला जाईल. तर, दुसरा सामना एमसीजीमध्ये 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या मुख्य संघातील खेळाडू आणि ‘अ’ संघाच्या खेळाडूंमध्ये इंट्रा स्क्वॉड सामना होईल. हा सामना 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान वाका येथे खेळवला जाईल.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कधी?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक दिवस-रात्र कसोटी सामनाही होणार आहे. पहिला कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे होणार आहे. दुसरा सामना अ‍ॅडलेडमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे, जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तिसरा कसोटी सामना गाब्बा येथे, चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे आणि पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी - 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी - 6 ते 10 डिसेंबर, अ‍ॅडलेड
तिसरी कसोटी - 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन;गाबा
चौथी कसोटी - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी - 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
Exit mobile version