| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक प्रक्रियेनुसार नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, छाननी, माघार तसेच अध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरूवारी (दि.21) सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत म्हसळा नगरपंचायत सभागृहात पार पडणार आहे. म्हसळा नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून, शुक्रवारी (दि.22) अर्जांची छाननी होणार आहे. सोमवारी (दि.25) नामन्निर्देशन पत्र फेटाळले गेले आहेत त्यांची नावे प्रसिद्ध करणे, मंगळवारी (दि.26) सकाळी 11.00 ते 2.00 वाजेपर्यंत पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपिल दाखल करणे, तसेच त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवारी (दि.27) दुपारी 3.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि.29) प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदासाठीची विशेष निवडणूक सभा दि.1 जून रोजी दुपारी 12.00 वाजता आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर मतदान प्रक्रिया व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सत्ता संघर्ष विकोपाला गेल्यापासून म्हसळा नगर पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणूकिला रायगड जिल्ह्यात नवा ट्विस्ट सुरू झाला आहे.







