मुलांसाठी किल्ले बनवण्याचे प्रशिक्षण

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

दिवाळी सुट्टीत शाळकरी मुलांना किल्ले बनविण्याचे वेध लागतात. परंतु, त्यांना अनुभव अथवा प्रशिक्षण नसल्यामुळे हवे तसा किल्ला बनविता येत नाही. त्यामुळे गुरुकृपा प्रतिष्ठान आयोजित ‌‘मराठी आमुची मायबोली’ स्पर्धेच्या माध्यमातून मुलांसाठी किल्ले बनवण्याचे प्राशिक्षण कर्जतच्या शिवमल्हार गटाच्या माध्यमातून रा.जि.प शाळा माजगाव येथे देण्यात आले. यावेळी बहुसंख्येने शाळकरी मुले उपस्थित होती.ही स्पर्धा ग्रुप ग्रामपंचायत माजगाव या परिसरातील मुलांसाठी असल्याचे संदेश पाटील, मनोज पाटील, किरण ढवाळकर, कौस्तुभ ढवाळकर, प्रतिक काठावले, सुशांत काठावले, तेजस ढवाळकर, आदित्य पाटील, राज काठावले, विवेक ढवाळकर, जीवन काठावले, साहिल जाधव, चैतन्य पाटील, हर्ष काठावले, दीपक पाटील यांनी बोलतांना सांगितले. या किल्ल्यांचे परिक्षण नेताजी पालकर मंडळ चौक यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Exit mobile version