| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील माजगाव गावात राहणारे दत्तात्रेय रामचंद्र काठावले यांचे दि. 1 मे रोजी अल्पशा अजाराने निधन झाले. निधनसमयी ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार, दि.10 मे रोजी श्रीक्षेत्र साजगाव धाकटी पंढरी येथे होणार आहे. तर, उत्तरकार्य मंगळवार, दि. 13 मे रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा दिलीप, संदीप, मुली, बहिणी, सुना, नातवंडे, पंतवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.