| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील गोवठणे गावातील अंगणवाडी सेविका मंदा श्रीराम म्हात्रे (मंदा काकू) व शकुंतला नरेश पाटील (शकून बाय) या दोघीही 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अंगणवाडी सेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना आपल्या गावातील बर्याच लहान मुलांना या दोघेही अंगणवाडी सेविकांनी नुसते प्राथमिक शिक्षण दिले नाही तर, त्यांचे आरोग्य सांभाळले, त्यांना सकारात्मक बनविले, अ म्हणजे अन्न, आ म्हणजे आरोग्य कसे सांभाळायचे याचे धडे दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उरण भाजप महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे यांनी आयोजित केला होता. सेवानिवृत्त वेळी अनेक महिला, ग्रामस्थ व उपस्थितांना अश्रू अनावर झाले.