| खरोशी | प्रतिनिधी |
पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवली. या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले, संस्थेच्या संचालिका डॉ. नीता कदम शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात ज्या शाळा स्तरावर विविध स्पर्धा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या त्या सर्व सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धंचे बक्षीस वितरण शाळेत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. अध्यक्ष वाचनामध्ये वसंत आठवले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये मिळवलेलं जे यश आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगे आहे. यापुढेही त्यांनी अशीच भरघोस बक्षीस मिळवून स्वतःबरोबर शाळेचे नाव लौकिक करावे, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.







