शाळेची गोमाशी लेणी-संरक्षित स्मारकास क्षेत्रभेट

ध्यानस्थ बुद्ध मूर्ती पाहून विद्यार्थ्यांनी केले ध्यान

| बेणसे | वृत्‍तसंस्था |

आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 अंतर्गत प्रत्येक शनिवार हा अर्थात दप्तराविना आनंददायी शनिवार म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व मार्गदर्शक पुस्तिकेनुसार साजरा होत आहे. त्याचाच एक भाग व श्रावणातील वर्षा सहल हाच धागा पकडून रायगड जिल्हा परिषद शाळा नेणवलीची क्षेत्रभेट गोमाशी लेणी येथे नुकतेच संपन्न झाली.

गोमाशी पासून जवळच तोरंकेवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत डोंगर व निसर्गरम्य अशा ठिकाणी ही गोमाशी लेणी वसली आहे. रस्त्यावरून दिसून न येणारी पण थोडे पुढे गेल्यावर मुलांना काही अंतरावर पायऱ्या दिसल्या थोडे चढ गेल्यावर दगडाच्या कपारीत ही लेणी पाहून त्यात आतमध्ये पद्मासनात बसलेली बुद्ध मूर्ती ध्यान करताना पाहून शाळेचे विद्यार्थी सुद्धा न सांगता आतमध्ये ध्यान करीत बसले. ही मूर्ती तीच निरीक्षण, लेणीची वैशिष्ट्य, आतील व बाह्य दगड ह्याची ओळख मुलांना मिळाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून 1958 रोजी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले असून त्याची नासधूस केल्यास दंड केला जातो. ह्याची माहिती मुलांनी घेतली.

गोमाशी लेणी हे आपल्या सांस्कृतिक वारसाचे एक अमूल्य दागिने आहेत. या लेणींचे वास्तुशिल्प आणि त्या काळातील जीवनशैलीची झलक विद्यार्थ्यांना पाहण्यास मिळाली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक स्थळांबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यांच्यात देशप्रेम भावनाही रुजवण्यास मदत झाली. बाजूला डोगरवरून पडणारा पाण्याचा धबधबा लक्ष वेधून घेत होता. मुलांनी येथे निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले निरीक्षण, डोंगर, नदी, बंधारा ह्याची माहिती घेतली. बाजूलाच असणाऱ्या गौमित फार्महाऊस ला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. ह्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मनोहर कोंडे व शिक्षणतज्ज्ञ श्री.महेंद्र पडवळ व पालक सदस्या ह्यांनी विशेष सहकार्य केले. क्षेत्रभेट नियोजन मुख्याध्यापक श्री. राजेंद्र अंबिके,विषयशिक्षक श्री. रवींद्र हंबीर, उपशिक्षक श्री.गणपत वरगडे व नवनियुक्त शिक्षक श्री.शँकर जाधव ह्यांनी केले.

आज ह्या क्षेत्रभेटीतून गोमाशी लेणी व आनंददायी शनिवार आम्ही खूप मज्जा व माहिती घेतली.

साक्षी सोनावले, विद्यार्थीनी, 6 वी

आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत परिसरातील गोमाशी लेणी अर्थात राष्ट्रीय स्मारक नक्की काय आहे हे मुलांना ह्या क्षेत्रभेटीतून दाखवण्याचा प्रयत्न!!

श्री. राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक, नेणवली
Exit mobile version