| पनवेल | वार्ताहर |
तुर्भे सेक्टर 20 येथील सामंत विद्यालयात चोरी झाली असून प्राथमिक विभागातील कार्यालयात घुसून चोरट्याने 90 हजार 300 रुपयांची रोकड चोरी केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शाळेच्या शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी शाळेला टाळे लावले होते, मात्र दुसर्या दिवशी सकाळी आल्यावर कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कडी कोयंड्यासहित तोडलेले आढळून आले. आत पाहणी केली असता रोकड चोरल्याचे लक्षात आले.