| पनवेल | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे स्कूल व्हॅनवर झाड पडून व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नवीन पनवेल सेक्टर 13 येथील समाज मंदिर बाजूस असलेल्या गार्डनमधील झाड पावसामुळे रस्त्यावर पडून रिकामी स्कूल व्हॅन त्याखाली सापडल्याने स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे.