माथेरानमध्ये शनिवारी दफ्ताराविना शाळा

शासनाच्या निर्णयाची अंमबजावणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
शिकू आनंदे….शासनाच्या शिक्षण विभागाच्या या धोरणानुसार माथेरान शहरातील प्राथमिक शाळेत शासनाच्या या निर्णयाची अंबलबजावणी करण्यात आली आहे. माथेरान मध्ये या निर्णयाच्या माध्यमातून शनिवारी शाळा भरतील मात्र, शनिवारी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तर नसेल.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या शिकू आनंदे या अभियाना अंतर्गत दर शनिवारी, दप्तर विना शाळा हा उपक्रम सुरु केला आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम तेथील प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या मुलांसाठी राबविण्यास सुरुवात झाली आहे. माथेरान पालिकेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या प्राथमिक शाळेत दफ्तर विना अशा भरू लागल्या आहेत. शनिवारी या विद्यार्थ्यांसाठी दर शनिवारी वेगवेगळ्या विषयात प्रत्यक्ष मुलांचा सहभाग आणि त्या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी पुस्तकांशिवाय एक दिवस असे सत्र राबविले जात आहेत. त्याशिवाय परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थांशी हितगुज,चर्चा सत्र, खेळ असे उपक्रम राबविले जात आहेत.

त्याचवेळी विद्यार्थ्यांना समाजातील सर्व क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची विद्यार्थांना ओळख व्हावी यासाठी काही विद्यार्थिनींनी समाजातील आदर्श, कर्तृत्वान, महिलांची वेशभूषा करून त्यांचे विचार आपल्या शाळेतील अन्य विद्यार्थी यांच्यासमोर व्यक्त केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ठ पद्धतीचा ग्रुप नृत्य याचे देखील सादरीकरण यावेळी विद्यार्थिनी केले. या नवीन उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आणि अंमबजावणी कशी सुरु आहे याची पाहणी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या प्रशासक सुरेखा भणगे यांनी केली.

Exit mobile version