दप्तरमुक्त शनिवार, वडगाव शाळेचा उपक्रम

बाल वैज्ञानिक तयार करण्याचा संकल्प

| रसायनी | वार्ताहर |

वडगाव शाळेत अवतरले बालवैज्ञानिक त्यांनी बनविल्या ब्रेन कॅप, शनिवार दप्तर मुक्त करून घेतला बाल वैज्ञानिक बनण्याचा संकल्प. वडगाव शाळेची तालुक्यात वाह वाह.

रायगड जिल्हा परिषदेची ग्रामीण उत्कृष्ट शाळा, वडगाव या शाळेतील शिक्षक सुभाष राठोड यांनी अगस्त्या फाऊंडेशनने घेतलेल्या विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणानंतर आज शाळेत दप्तरमुक्त शनिवारसाठी ब्रेन कॅप बनविण्याचा उपक्रम घेतला. यावेळी मुलांनी व सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. चौथी ते आठवीच्या मुलांनी कृतीयुक्त पद्धतीने तयार केलेल्या ब्रेन कॅप आज गावातील लोकांसाठी वेगळेच आकर्षण होते. सर्व मुले व शिक्षक डोक्यावर कॅप घेऊन शाळेतून निघाले, या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

वडगाव शाळा नेहमीच छान उपक्रम शोधून काढत असतात, त्यामुळे शाळेचे शैक्षणिक आकर्षण कायम राहते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा ठोंबरे यांनी सिप्ला कंपनी व अगस्त्या फाऊंडेशनकडून प्रशिक्षण घेतले, त्याचा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी फायदा होत आहे, छोटे-छोटे प्रयोग मुले आनंदाने करत आहेत. मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी सांगितले.

Exit mobile version