। खरोशी । वार्ताहर ।
खरोशी ग्रामपंचायत उपसरपंच मानसी महेश घरत, वैकुंठ पाटील मित्र मंडळ आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या मार्फत विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पधचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन राजिपचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच मानसी महेश घरत, सदस्या प्रणाली चंद्रकांत घरत, पत्रकार धनाजी घरत, अनंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश घरत, माजी सरपंच पुजा घरत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणपत पाटील आदी उपस्थितीत होते.
यावेळी राजिप प्राथमिक शाळा खरोशी, दुरशेत, जिते, बळवली, खारपाडा, हनुमानपडा तसेच माध्यमिक शाळा खरोशी, जिते, खारपाडा या शाळांमधील 50 पेक्षा जास्त विज्ञान प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी चांद्रयान आदित्य एल-1, विविध औषधी वनस्पती उर्जेचे नवनवीन स्त्रोत, विजेवर चालणारी विविध उपकरणे, ज्वालामुखी, जलचक्र, हवेचा दाब आदी प्रतिकृती तयार करून परीक्षकांनी गुणांकन केले.
विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृतींचे परीक्षकांनी गुणांकन करून 1ली ते 5वी गटात प्रथम क्रमांकः राजिप शाळा हनुमान पाडा, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकः राजिप शाळा खरोशी, तर उत्तेजनार्थ राजिप शाळा दुरशेत. 6वी ते 8वी गटात प्रथम क्रमांकः श्री केळंबादेवी माध्यमिक विद्यामंदिर खरोशी, द्वितिय क्रमांकः राजिप शाळा खारपाडा, तृतीय क्रमांकः राजिप शाळा बळवली, चतुर्थ क्रमांकः बाळगंगा विद्यामंदिर चुनाभट्टी जिते, तर उत्तेजनार्थ राजिप शाळा खरोशी.
तसेच, पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्राची पाटील, अर्पिता पाटील, दर्शना पाटील, वनिता पाटील, प्रियंका घरत, भूमिका पाटील, नंदिनी घरत यांचा गट शिक्षणाधिकारी अरूणादेवी मोरे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.