। कर्जत। प्रतिनिधी।
कर्जत येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी येथील नागरिकांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. वेगवेगळ्या घटकांतील समाज जीवनाशी संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट तयार यावेळी केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव प्रवीण गांगल, मदन परमार हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश पिंपरे, राजेश भूतकर, मुख्याध्यापिका अश्विनी साळोखे, हेमा जोशी, अनुपमा चौधरी, नीता वडकर, रवींद्र राऊत, सोनाली हजारे, अलेन बिश्त, नगमा नजे हे उपस्थित होते.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मुख्यतः पर्यावरण, निसर्ग अशा विषयांवर हे प्रकल्प तयार केले होते. स्वयंचलित प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प, विद्युत ऊर्जेवर चालणारे गणितीय संकल्पना स्पष्ट करणारा प्रकल्प, शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावरदेखील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रकल्पातून आपली संकल्पना मांडली होती. एकूण 65 प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळाले. तर, आपल्या पाल्याने घेतलेला सहभाग पाहण्यासाठी पालकांनीदेखील येथे उपस्थिती दाखवली होती