ऊर्दू हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

| नागोठणे | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाची शाळा व कनिष्ठ महविद्यालय असलेल्या नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या ऊर्दू हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराणच्या पठणाने करण्यात आली. नंतर मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळ पास 50 प्रतिकृती बाल वैज्ञानिकांनी बनविले होते. सदर प्रतिकृतीचे परीक्षण रोहा तालुक्यातील विज्ञान गणित मंडळाचे अध्यक्ष टिळक खाडे तसेच अंजुमन इस्लाम जंजिरा स्कूल रोहाचे विज्ञान शिक्षक रमझान सर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शाळेतील ज्येष्ठ शिक्षक लाडजी बागबान यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचे प्राध्यापक डॉ.अनिस शेख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांनी खूप मेहनत घेतली.

या कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचयतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे सचिव लियाकत कडवेकर, संचालक सगिर अधिकारी, शब्बीर पानसरे, डॉ. सदिया दफेदार, शबाना मुल्ला, सुलताना लंबाते, शहनवाज अधिकारी, जन्नत कुरेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version