| पेझारी | वार्ताहर |
को.ए.सो. ना .ना पाटील हायस्कूल व महाविद्यालय पोयनाड येथील डॉ. भाभा विज्ञान मंडळातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य के. के. फडतरे यांच्या हस्ते विज्ञान दालनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एस. के. पाटील, तृप्ती पिळवणकर, वशिष्ठ पवार, महानंदा ठाकूर तसेच विज्ञान गणित शिक्षक होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय पाटील यांनी केले. विज्ञान प्रदर्शनामध्ये पाचवी ते सातवी, आठवी नववी, आणि अकरावीमधील विद्यार्थ्यांनी जवळजवळ 50 प्रतिकृती सादर केल्या होत्या. या प्रतिकृतींचे परीक्षण तज्ज्ञ शिक्षक राधिका आठवले आणि श्री. जाधव यांनी केले. सदर प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले तर आभार नम्रता भाटे यांनी