। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे विज्ञान आणि कौशल्य प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.तर, मुख्याध्यापक दिपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळा उपक्रमात विज्ञान आणि प्रकल्प या कार्यशाळेत भार्गवी इंटरप्राईजसचे प्रमुख तथा मुख्य मार्गदर्शक मनोज शितोळे व संगीता शितोळे यांनी उपस्थित शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुदर्शन कंपनीचे सीएसआर फंडाचे प्रमुख अमर चांदणे, मुख्याध्यापक दिपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.