| सुकेळी | वार्ताहर |
महामार्गावर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकणनाका जवळील मौजे गोडसई येथील गुरुनानक ढाब्या जवळ स्कुटीला झालेल्या अपघातात स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.8एप्रिल) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुनिल परशुराम मरवडे (वय-37 वर्षे) रा. तळवली, ता.रोहा हे आपल्या ताब्यातील होंडा कंपनीच्या अॅक्टिव्हा स्कुटीने कोलाडकडे जात असताना वाकण जवळील मौजे गोडसई येथील गुरुनानक ढाब्या जवळ आले असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी घसरली.त्यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले.