अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटी चालक ठार

। पनवेल । वार्ताहर ।
मुंब्राकडून पनवेलच्या दिशेने जाणार्‍या अज्ञात वाहनाने पुढे जाणार्‍या स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालक जागीच ठार तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या अपघातात ठार झालेल्या स्कुटी चालकाचे नाव गिरधारी सिंग (30) असे असून तो कळंबोली सेक्टर-1ई मध्ये लहान भावासह रहाण्यास होता. दोघा भावांनी गॅरेजमध्ये काम केल्यानंतर गिरधारी याने कामेश्‍वर याला घरी जाण्यास सांगून तो मित्र रवीकुमार सिंग याच्यासोबत जेवण आणण्यासाठी स्कुटी घेऊन गेला. गिरीधर काही अंतर पुढे गेला असतानाच मुंब्रा येथून पनवेलच्या दिशेने जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. यात गिरधारी याच्या डोक्यावर सदर वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला रवीकुमार हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version