नवी दिल्ली । वार्ताहर ।
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. गुरुवारी एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, ‘मी काही मुलींना भेटले, त्यांनी सांगितले की त्यांना अभ्यासासाठी स्मार्टफोनची गरज आहे. मी आज घोषणा करतीये की, उत्तर प्रदेशात काँग्रसची सत्ता आल्यावर पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलींना इलेक्ट्रिक स्कूटी आणि बारावी झालेल्या मुलींना स्मार्टफोन देण्यात येईल.’