। नवी दिल्ली । वार्ताहर ।
गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण भारतात मान्सूनच्या पावसाने थैमान घातलं आहे. निम्म्याहून अधिक देशातून मान्सून परतला असला तरी बर्याच राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. आणखी काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात, म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सून वापसी होणार आहे.